(मुंबई)
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घेतलेल्या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षांचा अंतिम निकाल मंगळवारी रात्री उशीरा जाहीर करण्यात आला आहे.
पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर जाहीर झाला असून पाचवीचे 23.90 टक्के तर आठवीचे 12.53 टक्के विद्यार्थी पात्र ठरले आहेत. राज्यभरातील इयत्ता पाचवीच्या एकूण 3, 82, 797 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 91,400 विद्यार्थी पात्र झाले. आठवीची परीक्षा 2,79,466 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 35,034 विद्यार्थी पात्र ठरले आहे.
31 जुलैला परीक्षा पार पडल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून या परीक्षेचा अंतरिम निकाल 7 नोव्हेंबर दिवशी जाहीर झाला होता. त्यानंतर विद्यार्थ्यांना, शाळांना गुणपडताळणी आणि निकालाबाबत अन्य तांत्रिक आक्षेप नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला होता. आता अखेर या परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे.
शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या लॉग इनमधून; तसेच पालकांना त्यांच्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येईल. http://www.mscepune.in आणि https://www.mscepuppss.in या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध करून दिल्या आला आहे.