(पाचल / वार्ताहर)
पाचल येथील हनुमान मित्र मंडळ नारकर वाडी हे मंडळ गेली कित्येक वर्ष हनुमान जयंती उत्सव वेगवेगळे उपक्रम, संस्कृतीक कार्यक्रम तसेच वेगवेगळ्या स्पर्धा घेऊन साजरे करत आले आहे. या उत्सवाला आत्तापर्यंत अनेक भक्तांनी भेट देऊन या मंडळाच्या स्तुत्य उपक्रमाला मनसोक्त दाद दिली आहे.
या वर्षी देखील नुकताच हनुमान जन्मोत्सव सोहळ्याला सुरवात झाली असून या सोहळ्यात 7 एप्रिल रोजी कोकणात नावाजलेला व अस्सल संगमेश्वरी बोलीमध्ये व कोकणच्या लोककलेवर आधारीत कोकणचा साज संगमेश्वरी बाज हा संगमेश्वरी शैलीतील हास्यमय कार्यक्रम पाहायला मिळणार आहे.
रविवारी 9 एप्रिल रोजी नारकरवाडीची सत्यनारायची महापूजा असून याचं दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत भजनी बुवांचा तिरंगी भजनाचा जंगी सामना पाहायला मिळणार आहे. यामध्ये बुवा संदीप पुजारे(देवगड), बुवा प्रवीण सुतार (देवगड), बुवा विनोद चव्हाण (कुडाळ), सहभागी होणार आहे.नुकत्याच सोहळ्याच्या सुरवातीला खुल्या ढोल वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ज्यात रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण चौदा संघांनी सहभाग घेतला होता.
अतिशय उत्साहात संपन्न झालेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक नवशा मारुती ढोलपथक वाघोटन देवगड. यांनी मिळवला असून द्वितीय क्रमांक सांब रवळनाथ चिंचघरी, रत्नागरी. यांनी मिळवला तृतीय क्रमांक पवार मंडळ दिवटेवाडी,राजापूर. यांना तर उत्तेजनार्थ गांगोदेव ढोल पथक आंगले व
गांगेश्वर ढोलपथक धामणपे यांना देण्यात आला.
अतिशय चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेचे परीक्षण अमोल रंगयात्रीचे चे सर्वे सर्वा तसेच अनेक कलांमध्ये माहीर असलेले श्री अमोल रेडीज यांनी व प्रशांत गुरव यांनी केले होते.