( पाचल / वार्ताहर )
पाचल व पाचल पंचक्रोशीतील सर्व वयोगटातील महिला व पुरुषांसाठी प्रथमच मोफत योगसाधना शिबीर ग्रामपंचायत पाचल येथील कै.स्वा. से.गो.बां.उर्फ आबा नारकर येथे आयोजित करण्यात आले आहे .या शिबिरात आपल्या उत्तम आरोग्यासाठी सर्वांनी सहभागी होण्यासाठी योग चित्त योगा क्लासेस मुंबई,पुरस्कृत योगसाधना च्या वतीने आव्हान करण्यात आले होते. त्याप्रमाणे या शिबिराला परिसरातून पुरुष व सायंकाळी महिलांसाठी होणाऱ्या शिबिरासाठी महिलांचा उत्तम प्रतिसाद लाभला आहे.
या शिबिरात योग अभ्यास,आहार नियोजन, प्राणायाम,आपल्या प्रकृतीनुसार योगाचे तज्ञामार्फत मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जात असून या एक दिवसीय निवासी योगशिबिरात, शारीरिक किंवा मानसिक व्याधींवर सकारात्मक परिणाम करणाऱ्या आसनांचा सराव तसेच सकाळी आणि संध्याकाळी प्रत्यक्ष योगासनांचा सराव करण्यात येत आहे. शिबिरात सर्व वयोगटातील पुरुषांसाठी सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत तर सर्व वयोगटातील महिलांसाठी सायंकाळी ४ वा प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
शिबिराच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच आत्माराम सुतार व ग्रामपंचायत सदस्य संजय पाथरे सौ. श्रुती चव्हाण यांच्याशी संपर्क साधण्याचे आव्हान करण्यात आले आहे. या शिबिरात योगप्रशिक्षक व मार्गदर्शक म्हणून श्री.अमित उतेकर, योग चित्त योगा क्लासेसचे महिला व पुरुष सहकारी मार्गदर्शन करणार असून याचे संयोजन श्री संजय शेट्ये संस्थापक जीवनदायीनी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र यांनी केलं आहे