(पाचल / तुषार पाचलकर)
पाचल – करक अर्जुना डॅम मध्ये चार चाकी कॅम्पर मधून अरगाव अर्जुना कॅनॉलमध्ये काम करणारे 10 कामगार धरणाच्या आतील बाजूला सदर पलटी होऊन त्यामध्ये दोन कामगार मृत्यूमुखी पडले आहेत. इतर 8 कामगार गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदरची घटना आज बुधवार दिनांक 14 जून सायंकाळी 6:30 वाजता घडली आहे. अपघात ग्रस्त वाहनाचा नंबर MH14 – ju1359 असा आहे. या अपघातामध्ये सुदाम कुमार वय 26 बनई वय 25 हे मयत झाले आहेत. तर सूर्यकुमार बिन(बिहार), उकाश कोरे (सांगली), समरपाल कस्य(मुरादाबाद), राहुल गणेशवाडे (मिरज), हिरांकुमार बिन, लहुकुमार बिन, दिपकुमार बिन, मक्सुदन हे आठ जण गंभीर आहेत.
जखमींची भेट घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात राजापूर तहसीलदार शीतल जाधव तात्काळ दाखल झाल्या आहेत.