(क्रीडा)
बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी पुढील वर्षी आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान दौरा करण्यास नकार दिल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. भारताच्या निर्णयानंतर पीसीबीने आशियाई क्रिकेट परिषदेतून (ACC) बाहेर पडण्यासंदर्भात विचार सुरू केला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील संबंधांचा परिणाम आणि दबाव दोन्ही देशांमधील क्रिकेट बोर्ड आणि क्रिकेट सामन्यांवर पडतो आहे. पाकिस्तान किक्रेट नियामक मंडळ भारतात होणार्या एकदिवसीय विश्वचषकातून माघार घेण्याचा विचार करते आहे.
बीसीसीआयच्या निर्णयानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) देखील 2023 मध्ये भारतात होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा विचार करत असल्याचे समजते आहे. भारताच्या निर्णयानंतर पीसीबीने आशियाई क्रिकेट परिषदेतून (ACC) बाहेर पडण्यासंदर्भात विचार सुरू केला आहे. आशिया कप स्पर्धेच्या निमित्ताने आता भारत आणि पाकिस्तान नियामक मंडळ आमनेसामने ठाकली आहेत.
पुढील वर्षी होणारा आशिया कप 50 षटकांच्या सूत्रानुसार खेळवला जाईल. आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेचे यजमानपद सोपवले आहे. योगायोगाने बीसीसीआयचे सचिन जय शाह हेच आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत.