पाकिस्तानातील शिक्षण संस्थांमध्ये होळीवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानची इस्लामिक ओळख वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. पाकिस्तानात अल्पसंख्याकाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सातत्याने सुरू असतो. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानातील शैक्षणिक संस्थांमध्ये होळी साजरी करण्यावर तिथल्या शिक्षण आयोगाने बंदी घातली आहे.
हा आदेश जारी करताना शिक्षण आयोगाने सांगितले की, पाकिस्तानातील इस्लामिक मूल्य राखणे गरजेचे आहे . त्यामुळे शैक्षणिक संस्थांमध्ये यापुढे होळी सारखे सण साजरे करता येणार नाही. असे सण साजरे केल्यामुळे इस्लामिक सांस्कृतिक मूल्यांची पायामल्ली होते. दरम्यान, पाकिस्तानी शिक्षण आयोगाच्या या निर्णयामुळे हिंदूंमध्ये तीव्र संतापाची भावना उठत आहे . परंतु पाकिस्तान सरकारच्या दडपशाहीमुळे तिथल्या हिंदूंना सरकारच्या निर्णयाला विरोध करता येत नाही.
Balochi Chaap during Holi celebrations Quaid-i-Azam University Islamabad 🖤🥀#Holi #QAU_Islamabad pic.twitter.com/E1ij84RqzI
— QAU News (@NewsQau) June 16, 2023
दरम्यान, इस्लामाबादच्या कायद-ए-आझम विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची होळी खेळतानाचा व्हिडिओ अलीकडेच व्हायरल झाला होता. यावरुन संपूर्ण पाकिस्तानात गदारोळ झाला होता. वास्तविक, हा सण साधारणपणे मार्चमध्ये साजरा केला जायचा, मात्र यंदा विद्यापीठ बंद असल्याने तो जूनमध्ये साजरा करण्यात आला. येथे शिकणारे सर्व धर्माचे विद्यार्थी एकत्र येऊन होळी साजरी करताना दिसले.
या विद्यापीठात होळीचा सण 12 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. होळीच्या या उत्सवात विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करत एकमेकांसोबत होळी साजरी केली. काहींनी याला पश्तो शैलीतील होळी म्हटले, तर काहींनी त्याचा अर्थ वेगळ्या प्रकारे लावला.
Welcome to Pakistan where our ancient Holi festival is banned in universities. HEC has issued an announcement after students celebrated Holi.
Islamabad must understand that Holi/Diwali is part of the Sindhi culture —Islamabad neither accepts our Sindhi language nor does it honor… pic.twitter.com/LOWkOAYLcg— Veengas (@VeengasJ) June 21, 2023