(सियालकोट)
भारत-पाकिस्तान फाळणीमुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे प्राण गेले, मालमत्तेचे नुकसान झाले आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदू मंदिरांचेही नुकसान झाले होते. फाळणीनंतर पाकिस्तानातील अनेक हिंदू मंदिरे बंद करण्यात आली होती, त्यातील काही नंतर उघडण्यातही आली. काही मंदिरांचे इतर वापरासाठी इमारतींमध्ये रूपांतर करण्यात आले. मात्र पाकिस्तानमध्ये सर्वात जुने असलेले मंदिर, जे फाळणीच्या काळापासून 72 वर्षे बंद होते. हे मंदिर पुन्हा उघडण्यात आले आहे.
पाकिस्तानातील हे सर्वात जुने हिंदू मंदिर सियालकोटमध्ये आहे. शिवाला तेजी सिंह असे या मंदिराचे नाव आहे. 72 वर्षांनंतर जेव्हा हिंदू मंदिर पुन्हा उघडण्यात आले, तेव्हा या मंदिरातील कोरीव काम पाहून लोकांना अश्रू अनावर झाले. हे मंदिर इतके सुंदर आहे की हे मंदिर इतके वर्ष जुने आहे असे म्हणता येणार नाही. मंदिराच्या भिंती आजही भक्कम आहेत. या मंदिरात मोठमोठे दगड कोरण्यात आले आहेत, जे या मंदिराला वेगळे रूप देतात. शिवालय हा शब्द ऐकला की मनात छोट्याशा मंदिराचे चित्र उमटते, पण त्याचे सौंदर्य पाहिल्यावर हे मंदिर खूप खास असल्याचे लक्षात येते. तसेच, सर्वात मोठी गोष्ट म्हणजे इतकी वर्षे बंद राहूनही मंदिराच्या भिंतींना कोणतेही नुकसान झालेले नाही. मंदिराच्या भिंती अजूनही शाबूत आहेत. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान यांनी २०१९ मध्ये या मंदिराचे उद्घाटन केले होते. हे मंदिर पुन्हा खुले होताच त्यामध्ये देवी-देवतांच्या मूर्ती बसवण्यात आल्या असून पूजाही सुरू करण्यात आली आहे.