(त्रिनिदाद)
पहिल्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने पाच धावांनी विजय मिळवला आहे. वेस्ट इंडिजने दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला ९ विकेटच्या मोबल्यात १४५ धावाच करता आल्या. भारताकडून तिलक वर्मा याने सर्वाधिक ३९ धावांची खेळी केली. पाच सामन्याच्या टी-२० मालिकेत वेस्ट इंडिजने १-० ने आघाडी घेतली.
टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला. पहिल्या T20 सामन्यात वेस्ट इंडिज संघाने टीम इंडियाचा 4 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी, वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 149 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोव्हमन पॉवेलने सर्वाधिक 48 धावा केल्या. टीम इंडियाकडून युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाला 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 145 धावा करता आल्या. टीम इंडियाकडून टिळक वर्माने सर्वाधिक 39 धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोमारियो शेफर्ड, जेसन होल्डर आणि ओबेड मॅकॉय यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा टी-20 सामना उद्या शनिवारी म्हणजेच 5 ऑगस्ट रोजी खेळवला जाणार आहे.
वेस्ट इंडिजने दिलेल्या १५० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. ईशान किशन आणि शुभमन गिल यांना मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही सलामी फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. इशान किशन अवघ्या ६ धावांवर तंबूत परतला तर शुभमन गिल अवघ्या ३ धावा काढून बाद झाला. इशान किशनने ९ चेंडूत एका चौकाराच्या मदतीने ६ धावा केल्या. २८ धावांत भारताने २ विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने डाव सावरला. परंतु इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
आघाडीचे ४ फलंदाज तंबूत परतल्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने संजू सॅमसन याला हाताशी धरत भारताची धावसंख्या वाढविण्याचा प्रयत्न केला. पण अनुभवी जेसन होल्डरने हार्दिक पांड्याला त्रिफाळाचीत करत ही जोडी फोडली. हार्दिक पांड्याने १९ चेंडूत ३ चौकारांच्या मदतीने १९ धावांचे योगदान दिले. हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन यांनी २६ चेंडूत ३६ धावांची भागिदारी केली. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर संजू सॅमसन यानेही लगेच विकेट फेकली. संजू सॅमसन १२ धावांवर धावबाद झाला. ११३ धावांत भारतीय संघाने ६ विकेट गमावल्या. अखेरीस अक्षर पटेल याने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण १३ धावांवर अक्षर पटेल झेलबाद झाला. अक्षर पटेल याने ११ चेंडूत एका षटकाराच्या मदतीने १३ धावा केल्या. त्यानंतर डाव गडगडला. त्यामुळे ४ धावांनी भारताचा पराभव झाला.
टी-20 मालिकेसाठी दोन्ही संघ
वेस्ट इंडिजचा संघ:
रोव्हमन पॉवेल (कर्णधार), काइल मेयर्स (उपकर्णधार), जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, शिमरॉन हेटमायर, जेसन होल्डर, शाई होप, अकील होसेन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, ओबेद मॅक्कॉय, निकोलस पूरन, रोमॅरियो शेफर्ड, ओडियन स्मिथ आणि ओशाने थॉमस.
भारतीय संघ:
इशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव , रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आणि मुकेश कुमार.