(जीवन साधना)
‘स्वप्न’ म्हणजे सूचक गोष्टींची गुंतावळ आहे. प्रत्येक व्यक्तीनुसार सूचक गोष्टींचा अर्थ वेगळा असतो. ऋग्वेदात स्वप्नांचे कारण ‘वरुण देवता’ मानली आहे. ही देवता तुमच्या पाप/पुण्यांनुसार स्वप्ने देते. थोडक्यात, बक्षीस/शिक्षा असा सोपा मामला आहे. भविष्यकाळातील घटनांची सूचना म्हणजे स्वप्ने असा त्याचा अर्थ आहे. संस्कृत भाषेमध्ये शकुन म्हणजे पक्षी असाही एक अर्थ आहे. पूर्वीच्या काळात पक्ष्यांचे आवाज, दर्शन यांना महत्त्व द्यायची पद्धत होती. भारद्वाज पक्षी हा शुभ मानला गेला आहे, तर घुबड अशुभ मानले गेले आहे. त्याचा स्पष्ट परिणाम स्वप्नांचे अर्थ लावण्यावर दिसून येतो.
उपनिषदांच्या काळात आणि त्यांच्यापासून निर्मिलेल्या श्रीमद्भागवतामध्ये स्वप्ने ही तिसरी चेतन अवस्था (कॉन्शसनेस्) मानली गेली आहे. ब्रह्म आणि माया यामुळेच स्वप्ने पडतात. प्रत्येक स्वप्नाचा एक अर्थ असतो आणि यासंबंधीचे शास्त्र लिहून ठेवलेले आहे, जे आपल्या स्वप्नांचा अर्थ सांगतो. शास्त्रानुसार, पहाटे 3 ते 5 वाजेदरम्यान पाहिलेल्या स्वप्नाला काही कारण असते. कारण यावेळी स्वप्नांवर दैवी शक्तींचा परिणाम होत असतो.
पहाटे पडलेल्या स्वप्नांचा काय आहे अर्थ ?
-
जर स्वप्नात तुम्ही एखाद्या व्यक्तीला धान्य देत असाल आणि त्याचवेळी तुम्हाला जाग आली तर समजा तुम्हाला धनलाभ होणार आहे.
-
स्वप्नात एखादं लहान बाळ मस्ती करताना दिसलं म्हणजे धनलाभाचा इशारा आहे.
-
जर तुम्हाला स्वप्नात एखादा पाण्याने भरलेला घडा दिसला किंवा मोठ्या पात्रात पाणी भरलेले दिसले, तर निश्चितच तुम्हाला धनलाभ होतो. त्याचबरोबर मातीचा घडा दिसला तर ते सर्वश्रेष्ठ असते. अशा व्यक्तीला धनलाभासोबतच जमीनीच्या व्यवहारात लाभ होतो.
-
स्वप्नात स्वत:ला किंवा दुसऱ्या व्यक्तीला अंघोळ करताना पाहणे हे शुभ असते. हे स्वप्न जर तुम्हाला प्रवासादरम्यान पडले, तर तुम्हाला त्या यात्रेपासून धनलाभ होण्याचे संकेत असते.
-
गंगा नदीत स्नान करतानाचे स्वप्न पाहणे खूप शुभ असते. यामुळे कुठेतरी अडकलेला पैसा किंवा दिलेली उधारी तुम्हाला लवकरच मिळू शकते.
-
स्वप्नात जर तुमचा दात तुटला, तर लवकरच धनप्राप्ती होते. तुम्हाला नोकरी-व्यवसायात लाभ मिळण्याचे संकेत असते.
-
स्वप्नात कोणाचा खून होताना पाहिलं तर धनलाभ होतो. यामुळे अडकलेला पैसाही परत मिळण्याची शक्यता आहे.
-
स्वप्नात तुम्ही नोकरीची मुलाखत देत असाल, तर लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ होण्याचा होण्याची शक्यता आहे.
-
स्वप्नात दिवंगत पूर्वजांना पाहणे धनलाभेचं संकेत असते.
-
जर एखादे मंदिर, शंख, गुरू, शिवलिंग, ज्योत, घंटा, द्वार, राजा, रथ, पालखी, आकाश आणि पौर्णिमेचा चंद्र दिसला, तर या गोष्टी धर्म-पुराणात शुभ मानल्या जाते. यासंबंधीच्या बऱ्याच कथाही लोकप्रिय आहे.
टीप : वरील माहिती सामाजिक मान्यतेवर आधारीत आहे.