(मुंबई)
मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पवार-शेलार पॅनलचे अमोल काळे एमसीएचे नवे अध्यक्ष झाले आहेत. तर माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत अमोल काळे यांना १८१ तर संदीप पाटील यांना १५८ मते मिळाली आहेत. काळे यांनी २३ मतांनी ही निवडणूक जिंकली आहे. या निवडणुकीसाठी ३ ०० पेक्षा अधिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीचे खास वैशिष्टये म्हणजे राजकारणातील कट्टर विरोधक नेते या निवडणुकीसाठी एकत्र आले होते.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजप नेते आशिष शेलार यांचे संयुक्त पॅनल निवडणुकीत उतरले होते. या पॅनलचे उमेदवार अमोल काळे अध्यक्षपदी विजयी झाले आहेत. यासाठी शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच व्यासपीठावर आले होते.
संजय राऊत यांनी राज्यातील सर्वात मोठा घोटाळा अमोल काळे यांनी केल्याचा आरोप केल्यानंतर हे काळे कोण, याची चर्चा रंगली होती. कोणत्याही टेंडरशिवाय कॉन्ट्रॅक्ट देण्यात आल्याचे आरोपही संजय राऊत यांनी केले होते.