(मुंबई)
शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ या निवासस्थानी फोन करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली असून, कॉल करणा-याची ओळख पटवण्यात आली आहे. तर दुसरीकडे फोन करणारा व्यक्ती हा वेडा असल्याचा दावा शरद पवार यांच्या कार्यालयाच्यावतीने करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी धमकीचा कॉल करणा-याची ओळख पटवली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीचे लोकेशन ट्रेस केले असून, ही व्यक्ती बिहारचा असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी देखील याच व्यक्तीने एकदा शरद पवार यांना फोनवरून धमकी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतले होते.