(चिपळूण)
नेहरू युवा केंद्र रत्नागिरी (युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय भारत सरकार) स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्था चिपळूण व न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज खेर्डी चिंचघरी सती यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयामध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत ‘जलसुरक्षा व जलसंधारण’या विषयावर शनिवार दिं.27/1/2024 रोजी मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्था चिपळूणच्या अध्यक्षा सौ.स्वरा सावंत यांनी केले यानंतर उपस्थितांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते श्री. अमित आदावडे यांनी जलसंधारण व जलसुरक्षा या विषयावर मार्गदर्शन करताना अन्न, पाणी, हवा या मानवाच्या मूलभूत गरजा आहेत जमिनीच्या पोटात पाण्याचा साठा कमी प्रमाणात आहे. पाण्याचा वापर वीज निर्मिती करण्यासाठी करतात पाण्याचा पुनर्वापर केला जातो. त्याच पाण्याचा वापर शेती करण्यासाठी केला जातो अशा पद्धतीने पाण्याचा कमी वापर करून आपण जलसंधारण करू शकतो. ‘जल ही जीवन है’ पृथ्वीशिवाय इतर कोणताही ग्रह नाही जिथे जीवसृष्टी आहे पर्यावरण संरक्षण करण्यासाठी निसर्गातील संसाधनाचा जपून वापर करावा. तलाव, धरणे, बंधारे व शेततळे तयार करून पाण्याची साठवण करता येईल या विषयावर विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमाला स्वामिनी सामाजिक कौशल्य विकास संस्था चिपळूणच्या सौ. एकता सावंत व कुमारी श्रावणी भुवड उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचा इयत्ता आठवी व नववीच्या 100 विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय वरेकर यांनी विद्यार्थ्यांना जलसुरक्षा व जलसंधारण याविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.सुनीता वारंग यांनी केले व आभार सौ.स्नेहल भोसले यांनी मानले.