( मुंबई )
विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक या ४ जागांच्या निवडणुकीसाठी आज बुधवारी मतदान होत आहे. आज सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत ४ जागांसाठी मतदान होईल, तर या निवडणुकीची मतमोजणी १ जुलैला होऊन निकाल जाहीर केले जातील.
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पसंतीक्रमाने मतदान होते. त्यामुळे या निवडणुकीची उत्सुकता आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीला एकसंघपणे सामोरे जाणाऱ्या सत्ताधारी महायुतीने मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात एकमेकांसमोर उमेदवार उभे केले आहेत, तर महाविकास आघाडीने महायुतीच्या विरोधात एकास एक उमेदवार दिला आहे.