(मुंबई/किशोर गावडे)
पराग विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज तलावजवळ, भांडुप पश्चिम येथे मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीर शनिवार दिनांक १० सप्टेंबर २०२२ सकाळी १० ते २ या वेळेत संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आयोजन पराग विद्यालयाचे संचालक व शिवसेना उपविभाग प्रमुख पराग सुभाष बने यांनी केले होते. या शिबिरात अनेक पुरुष व महिलांनी मोफत मोतीबिंदू तपासणी करून घेतली. तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने शस्त्रक्रिया करणेबाबत माहिती दिली गेली.
आपल्याला बीपी, शुगर व इतर ऑपरेशन झाली असल्यास येताना कागदपत्रे घेऊन येणे व डॉक्टरांना कल्पना द्यावी. या शिबिराचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असेही आवाहन पराग सुभाष बने यांनी केले होते.