(चिपळूण / प्रतिनिधी)
मुंबई गोवा महामार्गावर सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. डोंगर कटाईचे हे काम सुरू असताना माती सैल होऊन दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू आहेत. आज गुरुवारी सकाळी परशुराम घाटात दरड कोसळली. ही दरड रस्त्यावर आल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. ठेकेदाराने जेसीबीच्या सहाय्याने दरडी काढत असताना काळजी घेणे गरजेचे आहे. सकाळी कोसळलेल्या या दरडी मध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, काही वेळ वाहतूक खोळंबली होती.
काही महिन्यांपूर्वी चौपदरीकरणाचे ही कामे सुरू असताना पेढे वस्तीत दगड कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या त्यामध्ये काहींच्या घरांचे नुकसान झाल्याचे समोर आले. तर आता गुरुवारी सकाळी दरड कोसळण्याची घटना घडली ही दरड रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती. नंतर ठेकेदार कंपनीने जेसीबी व पोकलेनच्या साह्याने ही दरड बाजूला केल्याने वाहतूक पूर्ववत झाली आहे.