( रत्नागिरी )
पोलिसांना चोरी किंवा इतर गुन्ह्यातील आरोपीला पकडण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये जावे लागते. तेव्हा त्यांना रेल्वेकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे पोलिसांची फरफट होते. तरी पोलिसांना रेल्वेने खास बाब म्हणून सहकार्य करावे.
दि.१९ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी ५ वा चिपळूण रेल्वे स्टेशनवर गांधीधाम गाडी थांबली. त्या गाडीने चिपळूण येथील पोलीस उपनिरीक्षक व दोन महिला पोलीस यांना गांधीधाम एक्स्प्रेस गाडीमधून आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गुजरातमध्ये जायचे होते. अशा वेळी कोकण रेल्वे प्रशासनकडून सहकार्य व गाडीमध्ये बसण्याची व्यवस्था झाली नाही, ती झाली पाहिजे,अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष मुकादम यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, कोणत्याही रेल्वे स्टेशनवर कोणताही गुन्हा घडला तर आर.पी.एफ रेल्वे पोलीसांना गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नसतो. यामुळे आर.पी.एफ पोलीस गुन्हेगारांना ताब्यात घेवून त्या-त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनला घेवून जावे लागते. तेव्हा रत्नागिरी पोलीस चांगल्या पद्धतीचे सहकार्य रेल्वे पोलिसांना करतात. परंतु महाराष्ट्रामध्ये चोरी करुन आरोपी परराज्यांमध्ये पळ काढतात तेव्हा आरोपीला पकडण्यासाठी जिल्ह्यातले पोलीस जातात, तेव्हा खास बाब म्हणून पोलिसांना रेल्वे गाड्यांमध्ये प्रवास करताना बसण्याची व्यवस्था झाली पाहिजे, अशी मागणी समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी केली आहे.