(संगलट / इक्बाल जमादार)
रेल्वे नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्टीत प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पनवेल आणि मडगाव दरम्यान १४ नाताळ व नवीन वर्ष विशेष ट्रेन चालवणार आहे. प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. चालविण्यात येणाऱ्या गाड्यांमध्ये गाडी क्रमांक ०१४२७/०१४२८ पनवेल- मडगाव- पनवेल विशेष (१२ फेऱ्या) ही गाडी आहे. या फेऱ्यांमध्ये गाडी क्रमांक ०१४२७ पनवेल मडगाव जं.२२.१२.२०२३ ते ३१.१२.२०२३ (६ फेऱ्या) पर्यंत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवार रोजी २१.१० वाजता विशेष पनवेल येथून सुटेल आणि मडगाव जंक्शन येथे दुसऱ्या दिवशी ६.५० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२८ मडगाव पनवेल स्पेशल मडगाव जं. २२.१२.२०२३ ते ३१.१२.२०२३ (६ फेन्या) दर शुक्रवारी, शनिवार आणि रविवारी सकाळी ८.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २०.१५ वाजता पनवेल येथे पोहोचेल. या गाड्यांना रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी हे थांबे देण्यात आले आहेत.
गाडी क्रमांक ०१४२९/०१४३० पनवेल- मडगाव- पनवेल नवीन वर्ष विशेष (२ फेऱ्या) यामध्ये गाडी क्रमांक ०१४३० मडगाव पनवेल नववर्ष विशेष गाडी मडगाव येथून ०१.०१.२०२४ रो २१.०० वाजता (एक फेरी) सुटेल आ पनवेल येथे दुसऱ्या दिवशी ०७.२ वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१४२ पनवेल मडगाव जं. नवीन वर्ष विज्ञ पनवेल ०२.०१.२०२४ रोजी ८.२ वाजता सुटेल (एक फेरी) आ मडगाव जंक्शन येथे त्याच दिव २१.३० वाजता पोहोचेल. या गाड्या रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रो रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रो कणकवली, कुडाळ, सावंतवाडी थिविम आणि करमाळी हे थांबे देण्यात आले आहेत.