प्रशासनामध्ये दरवर्षी विविध पदांवरील कार्यरत पात्र कर्मचार्यांना पदोन्नती दिली जाते. राज्यभरात काही जिल्ह्यांनी पदोन्नतीने पदस्थापना करण्यास सुरवातही केली आहे; परंतु रत्नागिरी जिल्हा परिषदेत त्यावर अजुनही कार्यवाही झालेली नाही. पदोन्नती हा प्रत्येक कर्मचारी, अधिकार्यांच्या नोकरीतील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. निवृत्तीच्या अखेरच्या टप्प्यावर असलेले अनेकजणांना याचा लाभ होत असतो. त्यामुळे दरवर्षी होणार्या या प्रक्रियेकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. त्यानुसार गतवर्षीपासून प्रशासन पदोन्नतीचा निर्णय घेईल या अपेक्षेने कर्मचारी प्रतिक्षा करत आहेत. ही प्रक्रिया सामन्य प्रशासन विभागाकडून केली जाते. सध्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे ही प्रक्रिया रखडली की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.