(रत्नागिरी)
आज राजापुर तालुक्यात कुणबी समाजाने पत्रकार वारिशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ निषेध महामोर्चा तहसीलदार कार्यालयावर धडकला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने कुणबी बांधव व रिफायनरी विरोधक सहभागी झालेले दिसून आले. रिफायनरी प्रकल्प राबवताना पत्रकार वारीशे यांचा बळी हा रिफायनरी लढ्यातील शेवटचा शहीद असेल यापुढे एकही शहीद होणार नाही, असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.
यावेळी राऊत म्हणाले, ज्या गोरगरीब जनतेकडून ३लाख हेक्टरने जमीनी विकत घेतल्या त्यामध्ये दलालांना ९७लाख रुपये देऊन दलालांचा पोट धंदा सुरू आहे. दलालांची पोट भरण्याचा उच्छाद बंद केला नाही तर, जनतेच्या उद्रेकाला सामोरे जावे लागेल असा थेट इशारा राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांना विनंती
विनायक राऊत यांनी रत्नागिरी पोलीस अधीक्षकांना विनंती करताना म्हणाले, गुंड आंबेरकरने या अगोदरही विरोधी आंदोलक मयेकर यांच्या गाडीला धडक दिली होती. तसेच न्यायालयाच्या आवारात विरोधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर पोलीसस्टेशन मधून विरोधकांनी समोरासमोर येऊन दाखवावे अशी धमकी दिली होती. पत्रकार वारीशे यांच्या मृत्युला जबाबदार असणाऱ्या गुंडाला जन्मठेपेची शिक्षा होण्याची मागणी राऊत यांनी यावेळी केली.