(रत्नागिरी)
पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मृत्यू प्रकरणात अटक असलेल्या संशयित पंढरीनाथ आंबेरकर याच्यावतीने न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. विरोधात बातमी लिहिल्याचा राग मनात धरून संशयित पंढरीनाथ आंबेरकर याने काही दिवसांपूर्वी पत्रकार शशिकांत वारीशे यांना आपल्या थार जीपच्या सहाय्याने ठोकर देऊन गंभीर जखमी केले होते. यात वारीशे यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी तपासानंतर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचप्रमाणे पत्रकार कायद्यान्वयेही गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी अटक केलेला संशयित पंढरीनाथ आंबेरकर सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये असून त्याच्यावतीने जिल्ह न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.