रत्नागिरी : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज मंडणगड येथील पणदेरी धरणाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, योगेश कदम, जिल्हाधिकारी मिश्रा आदी उपस्थित होते.
पणदेरी धरणाला गळती सुरू झाल्यानंतर तेथील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. कसलीही जीवितहानी होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.