(मुंबई)
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून घराघरात पोहचलेले पाठक बाई आणि राणा दादा आता खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे झाले आहेत. या दोघांच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेला प्रेक्षकांकडून खूपच लोकप्रियता मिळाली. अनेकांना या दोन्ही कलाकारांच्या भूमिका भावल्या होत्या. सध्या सिनेसृष्टीत लग्नसराई चा मोसम सरु असून अनेक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत.
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांनी खऱ्या आयुष्याला आता एकत्र सुरूवात केली आहे. नुकताच खुद्द अक्षयाने आणि हार्दिकने त्यांच्या आयुष्यातील खास क्षणांचे फोटो सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर सांगितलं आहे की, आम्ही फायनली एन्गेज झालो. पाठकबाई आणि राणादाच्या साखरपुड्यातील एक व्हिडिओ आणि काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ती एकमेकांच्या हातात अंगठी घालताना दिसत आहे.
हार्दिक सध्या ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’ या मालिकेमध्ये सिद्धार्थची भूमिका साकारत आहे. त्याचप्रमाणे अक्षयाने सध्या काही दिवसांसाठी सिनेसृष्टीतून ब्रेक घेतला आहे. तुझ्यात जीव रंगला ही मालिका या दोघांचीही पहिली मालिका होती. आता साखरपुड्याचे फोटो विविध सोशल मिडीयावर शेअर करताच अवघ्या काही वेळातचं या दोघांवर चाहत्यांकडून लाईक्स कमेंटचा वर्षाव सुरु झाला आहे. सध्या हे फोटो विविध कमेंट टाकत सोशल मिडीयावर व्हायरल होताना दिसत आहेत.