( खेड / इक्बाल जमादार)*l
पगार देत नसल्याचा राग मनात धरून कंपनीच्या अधिकाऱ्यावर धारधार कोयत्या हल्ला करण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना 2 जून रोजी सायंकाळी 4.50 वाजता सुप्रिया लाईफसायन्स कंपनी मध्ये घडली. या प्रकरणी प्रशांत रणसिंग सरकुंडे ( 37 रा. सुप्रिया लाईफसायन्स कंपनी लोटे) यांनी येथील पोलीसात फिर्याद दाखल केली आहे.
प्रशांत रणसिंग सरकुंडे हे कंपनी हॉल मध्ये काम करत असताना संशयित आरोपी हा धारदार कोयता घेऊन सरकुंडे यांच्या अंगावर धावून गेला व शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली.यावेळी इतरांनी त्याला अडवून हातातील कोयता घेतल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र या प्रकाराने कंपनीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सरकुंडे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीत याचेवर भादवि 452, 504 आणि भारतीय हत्यार अधिनियम 1959 चे कलम 4,25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.