(चिपळूण / ओंकार रेळेकर)
माजी आमदार सुभाष बने यांच्या काळातील कामाचा जो दरारा होता तो मी लहानपणापासून शिवसेनेत असल्यापासून पाहतोय सुभाष बनेंच्या कामाचा जो दरारा होता तो रोहन बने यांनी कायम ठेवला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असतानाही त्यांचे काम उल्लेखनीय झाले आहे.लहान वयात त्यांनी हे पद चांगल्या प्रकारे सांभाळलं अशा शब्दात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सचिनभाई कदम यांनी रोहन बने यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना कामाचे कौतुक केले .
उबाठा शिवसेना पक्षाचे चिपळूण-संगमेश्वर विधानसभा क्षेत्र संघटक तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन सुभाष बने यांचा वाढदिवस शहरातील हॉटेल ओयासिस सभागृहात गुरुवारी असंख्य शिवसैनिकांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीला कामाला लागा विजय आपलाच आहे. पक्ष सोडून गेलेल्यांची अवस्था येत्या निवडणुकीत समजेल असे सांगत निवडणुकीचे रणशिंग फुंकले त्यांच्या या आव्हानाला शिवसैनिकांनी जोरदार साद दिली.
शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनभाई कदम, चिपळूण संगमेश्वर विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, गुहागर तालुका प्रमुख संदीप सावंत,शहर प्रमुख शशिकांत मोदी, उपजिल्हा संघटक ऐश्वर्या घोसाळकर,तालुका संघटक मानसी भोसले, माजी तालुकाप्रमुख सुधीरभाऊ शिंदे, शहर संघटक सौ. वैशाली शिंदे आदी मान्यवर वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याला व्यासपीठावर उपस्थित होते . राज्यात काय चाललंय आपल्या विधानसभा मतदारसंघात काय चाललं आहे हे आपल्याला माहित आहे यादरम्यान रोहन बने यांना विधानसभा क्षेत्राचं पद देणे यामागे काही संदेश किंवा कारणे असू शकतात .
माणसाला दोन वेळा आमदारकी मिळून सुद्धा समाधान नसेल तर दुर्दैव आहे. आम्ही कॉलेज जीवनापासून शिवसेनेत काम करतोय निष्ठावंत शिवसैनिक म्हणजे काय असतं हे सांगताना सचिन कदम यांनी शिवसेनेतील जुन्या आठवणीला उजाळा दिला भारतीय विद्यार्थी सेना मध्ये १९८८ सालापासून आपण शिवसेनेत सक्रिय असल्याचे त्यांनी सांगितले पक्षात काम करतांना अपेक्षा जरूर असतात पण काय मिळालं नाही म्हणून रुसून फुगून विरोधकांच्या गाठीभेटी घ्यायचे हे कधीच आपल्या मनामध्ये आले नाही आणि येणार सुद्धा नाही कारण हा पक्ष जो आहे तुम्ही आम्ही जे कोणी आहोत ते फक्त आणि फक्त शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने शिवसैनिक म्हणून काम करीत आहोत ज्यांनी आपल्यासाठी पंधरा वर्षे वेळ दिला त्या निष्ठावंत मंडळींना विश्वासात न घेता दोन वेळा आमदारकी तिसऱ्यांदा पराभूत होऊन सुद्धा ज्या कार्यकर्त्यांनी पंधरा वर्षे आपल्यासाठी वेळ दिला स्वतःच्या खिशातला खर्च केला निव्वळ आणि निव्वळ या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकत राहावा या उद्देशानेच पण कोणालाही विश्वासात न घेता काहीजण कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून गेले अशी टीका सचिन कदम यांनी पक्ष सोडून गेलेल्यावर केली. पुढील काळात मतदारसंघांमध्ये याचे नेतृत्व कोणी करावे शेवटी संघटन उभे करत असताना पूर्वीचा काळ आत्ताचा काळ खूप फरक आहे. छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असतात आपल्या सर्वांना या सर्वातून एक चांगली उभारी घ्यायची असेल तर पुढे यायला पाहिजे एखाद्या नेतृत्व स्वतःहून पुढे येतंय त्या नेतृत्वाला आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे.
आपली शिवसेना आदेशावर चालते कोणतेही निवडणुका असू देत जो काय पक्षप्रमुखांचा आदेश असेल तो आदेश पाळून पुढे आपल्याला जायचं आहे. तरच या ठिकाणी भगवा फडकेल आज रोहन बने इच्छुक आहेत तर मी तर म्हणतो कुठलाही पदाधिकारी इच्छुक असणे गैर नाही जो पर्यंत पक्षप्रमुखांचा आदेश येत नाही तोपर्यं ईछा व्यक्त करणे गैर नाही. मागील निवडणुकीत मी सुद्धा इच्छुक होतो परंतु त्या वेळची कारणे वेगळी होती पण मला तिकीट नाही मिळाले म्हणून मी नाराज झालो नाही संघटनेवर अनेक संकटात आली राज्यावर आलेल्या संकट हे क्षणिक आहे. या निवडणुकीनंतर या लोकांची काय अवस्था होणार आहे हे थोड्या दिवसातच कळेल संघटनेला ताकद मिळण्यासाठी आमदार आणि खासदार ही दोन पदे महत्वाची आहेत ही पदे आपल्याला मिळणे गरजेचे आहे याकरिता आत्तापासूनच कामाला लागा येणाऱ्या विधानसभा लोकसभा विधानसभेत आणि लोकसभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा फडकवा असे आवाहन शिवसेना जिल्हा प्रमुख सचिन भाई कदम यांनी केले.
शिवसेना पक्ष आणि बने कुटुंबीयांचे नाते १९८५ सालापासूनचे आहे माजी ओळख शिवसेना पक्षामुळेच झाली जिल्हा परिषद सदस्य आणि जिल्हा परिषद अध्यक्ष हे पद मला शिवसेना पक्षामुळेच लहान वयात मिळाले. माझ्या निवडणुकीत बने साहेब चार महिने हॉस्पिटलला होते. अशा काळात आपणच ज्येष्ठ मंडळींनी माझे पालकत्व घेऊन मला निवडणुकीत निवडून आणले. साधी राहणीमान उच्च विचारसरणी घेऊनच मी शिवसेनेत काम करतोय. चिपळूण संगमेश्वरची जागा निवडून आणायची आहे. उमेदवार कोणी असो पक्षप्रमुख देतील तो उमेदवार आपण निवडून आणूया पक्षाचा उमेदवार देण्याचा अधिकार फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाच आहे ते जे उमेदवार देतील त्याचे आपण काम करून उद्धवजींना चिपळूणचा आमदार आणि लोकसभेत खासदार निवडून देऊया असे आवाहन रोहन बने यांनी आपल्या भाषणात बोलताना केले.
शिवसेना असा पक्ष आहे की ज्यांनी वडापाव गाडी चालवली त्यांना आमदार केले म्हणून आपल्या कामाची नोंद होते ती फक्त शिवसेना पक्षातच असे रोहन बरे म्हणाले. वाढदिवस साजरा करून शुभेच्छा देणाऱ्या सर्व शिवसैनिकांचे रोहन बने यांनी कृतज्ञता पूर्ण आभार मानले. रोहन बने यांचा वाढदिवस चिपळूण मध्ये दुसऱ्या एका आगळ्यावेगळ्या उपक्रमाने साजरा करण्यात आला चिपळूण शहरातील रामतीर्थ तलाव येथील भारतीय समाजसेवा केंद्र येथील अनाथ मुलांना विरंगुळाचे साधन म्हणून डिश टीव्ही संच, ट्युब लाईट संच आणि रोख स्वरूपात सहकार्य रोहन बने यांच्याकडून भेट स्वरूपात देण्यात आली. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाळा कदम, विनोद झगडे, राजू भागवत, शशिकांत मोदी, सुधीर शिंदे, मानसी भोसले,संतोष सुर्वे आदी मान्यवरांनी आपल्या भाषणातून रोहन बने यांना शुभेच्छा देत पक्ष संघटन वाढीसाठी जोरदार तयारीला लागा असे कार्यकर्त्यांना आवाहन केले.
शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू भागवत, मंगेश शिंदे,माजी सभापती धनश्रीताई शिंदे, माजी नगरसेवक मनोज शिंदे, युवा सेना तालुकाप्रमुख उमेश खताते, युवा सेना अधिकारी पार्थ जागूष्टे, तालुका सचिव संतोष सुर्वे, निशांत जंगम, विनीत बेर्डे, सिद्धेश सुर्वे, निशांत जंगम रेश्माताई पवार, प्रिया भुवड, अर्चना कारेकर, निता शिंदे, संध्या शिंदे, तृप्ती कासेकर, संतीता पाटणकर, जान्हवी महाडिक, निता शिंदे, तीर्था लाड, राणी महाडिक आदी पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्ते वाढदिवस कार्यक्रमाला उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना चिपळूण सचिव संतोष सुर्वे यांनी केले. तालुकाप्रमुख विनोद झगडे, शहर प्रमुख शशिकांत मोदी यांनी यशस्वीरित्या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले होते.