पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देशभरात अनेक ठिकाणी मंदिरे तयार करण्यात आली आहेत. आता सूरतमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चक्क सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली आहे. सोशल मीडियावर सध्या हा चर्चेचा विषय आहे. १८ कॅरेट सोन्यापासून ही मूर्ती तयार करण्यात आली आहे.
गुजरातमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने १५६ जागांवर विजय मिळवला होता. त्या पार्श्वभूमीवर ही १५६ ग्रॅम वजनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोन्याची मूर्ती तयार करण्यात आली होती. या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची १५६ ग्रॅमची सोन्याची मूर्ती तयार केली आहे, असे मूर्ती तयार करणाऱ्या मालकाने सांगितले. अनेक लोकांनी ही मूर्ती खरेदी करण्यासाठी ईच्छा प्रगट केली आहे. मात्र मूर्ती मालकाने ही मूर्ती विकण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही.