[ नवी दिल्ली ]
न्यायालयांनी निष्पक्ष असले पाहिजे, असे मत माजी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी व्यक्त केले. कॅपिटल फाऊंडेशन सोसायटीचा न्या. व्ही. आर. कृष्णा अय्यर पुरस्कार स्वीकारल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, जनतेच्या निर्णयांमुळे लोकशाहीत सुधारणा झाली पाहिजे. काही परिस्थितीत न्यायालयांनी विरोधकांची भूमिका पार पाडावी, अशी अपेक्षा केली जाते. १९६० ते १९७० हा आधुनिक भारतातील सर्वात आव्हानात्मक काळ होता. न्यायालयांनी संवैधानिक अधिकारांबाबत महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. न्यायामुळे सर्वात मोठ्या लोकशाही संविधानाचे पालनपोषण होत असते. एकाच सुरात बोलणे हे लोकशाहीसाठी चांगले नाही. भारतीय न्यायव्यवस्थेतील माझ्या अनुभवांवर बोलणे उचित नाही. कारण, मी नुकतेच सरन्यायाधीश पदावरून निवृत्त झालो आहे, असेही ते म्हणाले.