(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडखोरी आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनल्यानंतर आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या सर्व सदस्यांना नोटीस बजावून आपले म्हणणे ७ दिवसांत मांडण्यास सांगितले आहे. यात ठाकरे गटासोबत शिंदे गटाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांना नोटीस बजावली आहे. विधानसभा अध्यक्षांनी सर्वांना ७ दिवसांत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. यानंतर शिंदे गटात हालचालींना कमालीचा वेग आला आहे. राज्यातील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांची आज महत्वाची बैठक बोलवल्याची माहिती आहे.
विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १५ आमदार आणि उद्धव ठाकरे गटातील १४ आमदारांना अपात्रता प्रकरणात नोटिसा बजावल्या आहेत. या संदर्भात या बैठकीत कायदेशीर सल्ला आणि चर्चा केली जाण्याची शक्यता आहे बाळासाहेब भवन येथे सकाळी ११:३० वाजता ही बैठक होणार आहे.