( रत्नागिरी / प्रतिनिधी )
नोकरीचे आमिष दाखवून तरुणीशी जबरदस्तीने शारिरीक संबंध प्रस्थापित करून तिला मारहाण व ठार मारण्याची धमकी देणार्या संशयिताला न्यायालयाने रविवार 13 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. नरेश विठोबा जाधव (44,रा.सोमेश्वर बौध्दवाडी,रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात पिडीत तरुणीने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेश याने पिडीतेशी ओळख करुन तिच्या घरी सातत्याने जात होता. तिच्या वडिलांना अणि आजीला भेटून हिला माझ्याकडे कामाला पाठवा मी तुम्हाला चांगले पैसे देईन. तसेच तुमचा सगळा घर खर्च बघेन अशी आशा दाखवली. त्यानंतर मागील आठ ते नउ महिने नरेश जाधव पिडीतेला आपल्या सोमेश्वर येथील घरी जबरदस्तीने नेउन तिच्याशी शारीरीक सबंध प्रस्थापित करत होता. तिने नकार दिल्यास तो तिला शिवीगाळ करत मारहाण आणि ठार मारण्याची धमकीही देत होता.
या सर्व प्रकाराला कंटाळून पिडीतेने बुधवार 9 नोव्हेंबर रोजी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.त्यावरुन शहर पोलिसांनी नरेशला गुरुवार 10 नोव्हेंबर रोजी अटक करुन न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.