(रत्नागिरी)
तालुक्यातील नेवरे येथे विनापरवाना हातभट्टीची गावठी दारू बाळगल्याप्रकरणी महिलेविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (ता. ११) सायंकाळी नेवरे -मुरूगवाडी येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयित महिलेकडे विनापरवाना हातभट्टीची गावठी दारू सापडली.
या प्रकरणी पोलिसांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी संशयित महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत.