(मुंबई)
नॅशनल पेन्शन सिस्टम योजनेसाठी नवीन नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होईल. या अंतर्गत पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ने आता वार्षिक पेन्शन मिळवण्यासाठी KYC करणे अनिवार्य केले आहे. याचा अर्थ वार्षिक पेन्शन मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना नो युवर कस्टमर (KYC) संबंधित कागदपत्रे अपलोड करावी लागतील. एनपीएसच्या सर्व सदस्यांना हे बंधनकारक आहे. पीएफआरडीएने याबाबत म्हटले की, यामुळे एनपीएसमधून बाहेर पडल्यानंतर वार्षिक पेन्शन भरण्यास गती मिळेल आणि प्रक्रिया सुलभ होईल.
एएसपी या जीवन विमा कंपन्या आहेत ज्या IRDAI च्या नियमनाखाली येतात. NPS सदस्यांना सेवा देण्यासाठी आणि पेन्शनसह त्यांचे वृद्धापकाळ सुरक्षित करण्यासाठी PFRDA सोबत देखील सूचीबद्ध आहे. PFRDA ने असेही म्हटले होते की, सर्व नोडल अधिकारी/पीओपी हे निवडक कागदपत्रे अपलोड करण्याच्या महत्त्वाबद्दल ग्राहकांना जागरूक करावे. तसेच सदस्यांनी अपलोड केलेली खालील कागदपत्रे वाचण्यायोग्य आहेत का याची खात्री करणे गरजेचे आहे.
– NPS एक्झिट/विथड्रॉवल फॉर्म
– पैसे काढण्याच्या फॉर्ममध्ये ओळख आणि पत्त्याचा पुरावा
– बँक खात्याचा पुरावा
– परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN) कार्डची प्रत