( धुळे )
तरुणांच्या गळ्यातील ताईत व लावणी क्वीन गौतमी पाटील राज्यात चांगलीच प्रसिद्ध झाली आहे. लाखो रुपयांच्या सुपाऱ्या घेणाऱ्या गौतमी पाटीलचं महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलं आहे.प्रत्येक ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमाला तुफान गर्दीहोत असते तसेच अनेक कार्यक्रमात राडा तर ठरलेलाच असतो. कायम चर्चेत असणाऱ्या गौतमीच्या वैयक्तिक आयुष्याविषयीही नेहमी चर्चा होते. आता तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अशीच एक माहिती समोर आली आहे.
सुरत बायपास रस्त्यावर अज्ञात व्यक्ती मृताअवस्थेत पडलेला असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली. या माहितीवरून सामाजिक कार्यकर्ते सदर व्यक्ती जवळ पोहोचले. त्यांना हळुवार श्वास सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ या व्यक्तीस शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. परंतु ही व्यक्ती कोण? याबाबत कुठलीही माहिती न घेता या सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना थेट शासकीय हिरे वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
गौतमीच्या वडिलांना सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांचे आधारकार्ड सोशल मीडियावर टाकलं असता ते बेवारस व्यक्ती गौतमी पाटीलचे वडील असल्याची माहिती समोर आली आहे. सोशल मिडियावर मॅसेज व्हायरल केल्यानंतर त्यांना शंभराहुन अधिक फोन रविंद्र पाटील यांच्या प्रकृतीची विचारपुस करणारे आले. असल्याची माहिती दुर्गेश चव्हाण यांनी यावेळी दिली.या व्यक्तीच्या खिशातील आधारकार्डवर त्यांचे नाव रविंद्र बाबुराव पाटील (रा. वेळोदे ता. चोपडा) असल्याचे कळले. व्यक्तीशी संबंधितांनी संपर्क साधावा यासाठी चव्हाण यांनी सोशल मिडियावर मॅसेज व्हायरल केले. त्यानंतर रविंद्र यांच्याबद्दलची धक्कादायक आणि खळबळजनक माहिती समोर आली आहे.
रविंद्र पाटील यांच्या भावजाई शोभा आनंद नेरपगार ( पाटील ) या त्यांच्या मुलीसह रुग्णालयात पोहोचल्या. रविंद्र पाटील हे प्रसिध्द नृत्यांगना, लावणी नृत्य करणाऱ्या गौतमी पाटील हिचे वडील असल्याच्या वृत्ताला शोभाबाई यांनी दुजोरा दिला आहे. रविंद्र पाटील यांची पत्नी आणि मुलगी गौतमी या दोघी गेल्या पंधरा वर्षांपासून पुण्यात राहत असल्याचे त्यांनी सांगितले.
बेवारस अवस्थेत सापडलेल्या गौतमीच्या वडिलांची रवींद्र पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर धुळ्यातील भाऊसाहेब हिरे रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. याबाबतीत गौतमीकडून अद्याप कुठलंही वक्तव्य समोर आलेलं नाही.