(तरवळ/अमित जाधव)
राजापूर तालुक्यातील ओणी येथिल ज्ञानवंत वासुदेव तुळसणकर ज्ञान संकुलनात ओणी पंचक्रोशी शिक्षण मंडळ ओणी च्या नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधून इयत्ता 5वी, 8वी, 10वी, 12 वी तसेच शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षेत यशस्वी झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतीमेला व सरस्वती प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून तसेच प्रशालेच्या विध्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरवात केली. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. शैलेश शिंदेदेसाई हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेश बावधनकर , संस्था पदाधिकारी श्री. सुतार विधितज्ञ गुरुदत्त खानविलकर, व सौ भक्ती सावंत या उपस्थित होत्या.
सौ. तुळसणकर यांनी राजर्षी शाहू महाराज यांचे जीवनातील प्रसंग सांगून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देताना चांगले शिक्षण घेत असताना सतत अभ्यास करून असेच चांगले यश मिळवा, चांगले नागरिक म्हणून यशस्वी व्हावे असे सांगितले.
संस्था सह.कार्यवाह श्री. सुतार यांनी या यशाने हुरळून न जाता पुढील काळात चांगले यश मिळवण्यासाठी शुभेच्छा दिल्या, आणि पालक जागृत राहिले तर निश्चितच भविष्यात हे विद्यार्थी चांगले यशस्वी होतील असे सांगीतलें.
सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी चांगले दप्तर, एक पेन व गुलाब पुष्प देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. महेश बावधनकर वरिष्ठ महाविद्यालय लांजा मराठी विभागाचे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज जयंती व गुणगौरव कार्यक्रमानिमित्त खूप छान मार्गदर्शन केले व आपल्या मनाला विचारांचा, सदगुणांचा स्पर्श करून आयुष्य घडवा असा संदेश देत शिक्षण पूर्ण झाल्यावर मागे वळून आपल्या शाळेकडे ही पहावे हे आवर्जून सांगितले. श्री बावधनकर सरांचे व्याख्यान मुलांना व पालकांना प्रेरणादायी होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. पवार तसेच प्रास्ताविक श्री मिरगुले तर श्री.जाधव यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.