शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे साहेब ह्यांना तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानभरपाई बाबत व सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल होण्यासंदर्भात राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजनजी साळवी यांनी निवेदन दिले.
तौत्के चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच आढावा घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर आले असता राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांनी तौत्के चक्रीवादळामुळे झालेले नागरिकांना जी नुकसानभरपाई मिळणार आहे ती निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी ज्या निकषांनुसार मिळाली त्याचप्रमाणे नुकसानभरपाई मिळावी असे निवेदन देऊन याबाबत चर्चा केली.
त्याचप्रमाणे सध्या कोकणामध्ये कोव्हिडं-१९ चा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात होत असून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयावर मोठा ताण पडत असून राजापूर-लांजा तालुक्यातील नागरिकांना उपचारासाठी रत्नागिरी येथे यावे लागते तसेच महामार्गावर अपघात झाल्यावर उपचारासाठी रत्नागिरी येथून अधिक उपचारासाठी कोल्हापूर किंवा मुंबई व पुणे येथे जावे लागते परंतु येथे होणार खर्च रुग्णाचा नातेवाईकांना परवडत नाही.
म्हणून राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांनी मागील बरेच दिवसाची असलेली आग्रहाची मागणी असून त्यासंदर्भात आज शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धव ठाकरे ह्यांना त्याबाबत निवेदन देऊन ओणी येथे लवकरात लवकर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल व्हावे अशी आग्रही भूमिका मांडली. त्यामुळे महामार्गावर होणाऱ्या अपघातानंतर रुग्णांना ताबडतोब उपचार मिळून जीवितहानी कमी होण्यास मदत होऊन भविष्यात कोणतीही आजाराची साथ आली तरीही जिल्हा रुग्णालयात वर ताण कमी होण्यास मदत होईल.