(संगलट-खेड /इक्बाल जमादार )
चिपळूण तालुक्यातील ओमळी येथील नीलिमा चव्हाण हिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी व या प्रकरणाचा कठोर तपास करून दोषींना कडक शासन व्हावे यासाठी शिवसेना शिंदे गट व मनसेने प्रशासनाला निवेदन देत ही मागणी केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सचिन धाडवे व जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण व शहरप्रमुख कुंदन सातपुते सेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश भाई चिकणे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व शिवसैनिकांनी एकत्र येत पोलीस निरीक्षक, तहसीलदार व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक पप्पू चिकणे, स्वप्नील सैतवडेकर, संजना कुडाळकर, माधवी बुटाला यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी तालुकाध्यक्ष दिनेश उर्फ नाना चाळके यांनी पोलीस निरीक्षक यांना निवेदन सादर करून नीलिमा चव्हाण हिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. यावेळी त्यांच्यासोबत मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.