(निवोशी-गुहागर/उदय दणदणे)
कलर्स मराठी वरील भाग्य दिले तू मला या मालिकेच चित्रीकरण गुहागर तालुक्यातील पालशेत-निवोशी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात विविध परिसरात करण्यात आले आहे. सदर मालिकेत निवोशी गावचे पाहिले रिक्षा चालक अंकुश ठोंबरे यांना एका एपिसोड मध्ये रिक्षाचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे.
पालशेत गावची ग्रामदैवत झोलाई देवी मंदिरात सदर मालिकेचे चित्रीकरण झाले असून या मालिकेत कोकण आणि कोकणातल्या पालखीच महत्व यावर प्रकाश टाकणारा वास्तव विषयावर मांडणी करत कोकणातील सण संस्कृती याचे दर्शन घडविले आहे.
जे भूमिपुत्र काही कारणामुळे आपलं गाव आणि आपल्या ग्रामदेवतेला सोडून गेले ते कोणाच्या तरी मदतीने का होईना, पण आपलं गाव आणि आपल्या देवाला कसे भेटतात, गावच आणि आपल्या देवाचं महत्व कशा पद्धतीच असत, हे या मालिकेतून दाखवण्यात आले आहे.
भाग्य दिले तू मला, या मालिकेतील एका एपिसोड मध्ये अभिनेत्री निवेदिता सराफ यांना डॉक्टरांकडे रिक्षातून घेऊन जाण्यासाठी मला रिक्षाचालक म्हणून सहभाग मिळाला हे माझ भाग्य समजतो. २० वर्षाच्या कालावधीतील हा माझ्यासाठी अनमोल असा क्षण होता. असे निवोशी गावचे रिक्षाचालक अंकुश ठोंबरे यांनी प्रतिक्रिया देत सर्व कलाकारांना शुभेच्छा दिल्या. दिवस असो रात्र प्रसंग कोणताही असुदे प्रत्येकाच्या मदतीला धावणार हा निवोशी सुपुत्र रिक्षाचालक अंकुश ठोंबरे “कलर्स मराठी वाहिनीवर” “भाग्य दिले तू मला” मालिकेत झळकल्या बद्दल निवोशी- पालशेत ग्रामस्थ जनतेत आनंदाचे वातावरण आहे.