( रत्नागिरी / प्रतिनिधी )
तालुक्यातील निवळी तिठा येथे तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. शफिक रिजवान अली अहमद (२७, रा. निवळी मूळ उत्तरप्रदेश) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शफिक हा मुळचा उत्तरप्रदेश येथील रहिवासी असून मागील काही महिन्यांपासून तो निवळी येथे कामानिमित्त राहत होता. ५ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास शफिक याने राहत्या खालीमध्ये गळफास घेतला. खालीमध्ये दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत त्याचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी पोलीस पाटील भालचंद्र शितप यांनी पोलिसात खबर दिली. पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.