(प्रतिनिधी / रत्नागिरी)
मुंबई – गोवा महामार्गावरील निवळी घाटातील वळणावर शनिवारी रात्रीच्या सुमारास झोप अनावर झाल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटला. यामध्ये कंटेनर 45 फूट खोल दरीत कोसळला. कंटेनरने पहिली पलटी मारल्यानंतर दुसरी पलटी मारून दरीत कोसळणार एवढ्यात महावितरणच्या पोलला अडकल्याने सुदैवाने खोल दरीत कोसळण्यापासून बचावला. महावितरणचा पोल पूर्णपणे वाकला आहे. चालकाने मात्र प्रसंगावधान राखून उडी मारल्याने तोही थोडक्यात बचावला. मात्र तो जखमी झाला आहे. हा अपघात निवळीतील धबधब्यासमोरील अवघड वळणावर झाला. जखमी कंटेनर चालकाला रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.