( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमेश्वर जवळील निढळेवाडी येथे सोमवारी 19 डिसेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातात ट्रकने क्रुझर गाडीला जोरदार धडक दिली. या अपघातात क्रुझर वाहनातील चारजण जखमी झाले होते. या अपघातात दोन्ही वाहनांच्या नुकसानीस व चार जणांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक अरविंदभाई जयसिंगभाई बारिया (44, गुजरात) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गणपतीपुळे ते रायगड असा क्रुझर गाडीने पर्यटक जात होते. सागर साहेबराव दराके ( साखळी बुद्रुक बुलढाणा ) हा गाडी चालवत होता. महामार्गने जात असताना संगमेश्वर निढळेवाडी येथे हॉटेल मैत्री पार्क समोर आला असता मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने अशोक ले लँड कंपनीचा ट्रक चालक अरविंदभाई बारिया घेऊन जात होता. त्याने विरुध्द दिशेला जावून क्रुझरला जोरदार धडक मारली. यामध्ये क्रुझर गाडी मधील विकास नारायण उगले, विजय देवदास उगले, भरत सूर्यभान उगले, अंकुश रामभाऊ ( सर्व राहणार बुलढाणा) हे किरकोळ जखमी झाले. या सर्वांच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आणि दोन गाडयांच्या नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी ट्रक चालक अरविंदभाई बारिया याच्यावर भादविकलम 279, 337, मोटर वाहन कायदा कलम 184 नुसार गुन्हा दखल करण्यात आला आहे.