(संगमेश्वर / मकरंद सुर्वे)
संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडी येथील शाळेतील श्री मधुकरराव वाजे व श्री आनंद हर्डीकर या दोन शिक्षकांनी जि.प मराठी शाळेत हजर झाल्यापासून शाळेला आदर्श बनविण्याचा ध्यास घेतला होता. परंतु दोघांचीही बदली झाल्याने त्यांचा नुकताच त्यांचे श्रीफळ व भेटवस्तू देऊन प्रेमाचा निरोप देण्यात आला. या शिक्षकांनी विद्यार्थी, स्थानिक नागरिक, पालक तसेच माजी विद्यार्थी वर्ग यांच्याशी स्नेहाचे संबंध जोडले होते. शाळा कमिटी अध्यक्ष प्रदीप वाडकर आणि सहशिक्षकाचीही त्यांना मोलाची साथ मिळाली होती.
शासनाच्या योजनेतून नवीन शाळा इमारत बांधली गेली. त्यानंतर माजी विद्यार्थी यांच्या देणगीतून इमारतीला रंगरंगोटी करण्यात आले व सर्व कार्यामध्ये श्री मधुकर वाजे आघाडीवर होते. श्री मधुकर वाजे यांचा निरोप समारंभाच्या वेळी मुंबईतील मित्रमंडळ, श्री जीवन वाडकर, मधुकर वाडकर, कुलदीप वाडकर, सचिन वाडकर, समीर वाडकर, अनिल वाडकर, प्रशांत वाडकर, यश वाडकर, आकाश बोंडवलकर, आदींनी उपस्थित ती राहून शाळेतील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना वह्यांचे व बालवाडीतील मुलांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ महिला मंडळ पालक वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते.