(रत्नागिरी)
रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातील पावस येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन आज राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरी – रायगड जिल्ह्यांचे पालकमंत्री ना. उदय सामंत ह्यांच्या शुभहस्ते करण्यात आले. पावस गावातील २ कोटी ८६ लाखांच्या कामांचे भूमिपूजन करुन लवकरच काम सूरू होणार आहे. या कार्यक्रमला पावसाच्या कार्यक्रमात युवकांबरोबर ज्येष्ठाचीही उपस्थिती मोठी होते.यावेळेस पावसच्या विकासासाठी पालकमंत्री म्हणून कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन ना.उदय सामंत यांनी केले.
यावेळेस कार्यक्रमासाठी तालुकाप्रमुख बाबू म्हाप, प्रशांत पटवर्धन, महिला जिल्हा संघटक शिल्पा सुर्वे, महिला संघटक कांचन नागवेकर, उपतालुका प्रमुख सुनील नावले, अजय तेंडुलकर, विजय चव्हाण, दत्तात्रय शिंदे, प्रवीण शिंदे, युवा तालुका अधिकारी तुषार साळवी, माजी पंचायत समिती सदस्य श्री.सुशांत पाटकर, सचिन सावंत, तुषार साळवी, अभिजित दुडे, लाईक फोंडू, जावेद काजी, अक्रमशेठ नाकवा, मुदस्सर मुकादम, शफीशेठ काझी, गावचे सरपंच चेतना सामंत, उपसरपंच प्रवीण शिंदे,गावातील मुस्लिम समाजाचे पदाधिकारी, गावप्रमुख मान्यवर, आदी उपस्थित होते.