रत्नागिरी : दि. 6 जानेवारी 2022 रेाजी मा.ना. श्री उदय रविंद्र सामंत, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण महाराष्ट्र राज्य तथा अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी यांची अखिल भरतीय मराठी नाट्य परिषदेच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल नाट्य परिषद शाखा रत्नागिरी आणि स्थानिक रंगकर्मींच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करणेत येणार आहे.
त्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने रत्नागिरीतील रंगकर्मींचा रंगधारा हा कार्यक्रम स्वा. सावरकर नाट्यगृहामध्ये सायं. 6.30 वा. सादर केला जाणार आहे.
रंगधारा या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य हे आहे की, रत्नागिरीच्या नाट्य क्षेत्रातील गेल्या 36 वर्षांपासून कार्यरत असणा-या संस्थानी 36 वर्षांपूर्वी एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा यामध्ये सादर केलेल्या एकांकिका किंवा नाटकातील प्रवेश त्याच मूळ संचात सादर करणार आहेत.
सदर कार्यक्रमामध्ये खल्वायन, राधाकृष्ण कलामंच, आश्रय सेवा संस्था, समर्थ कृपा प्रॉडक्शन, रमेश किर कला अकादमी, जिज्ञासा, स्टार थिएटर, समर्थ रंगभूमी, क्षितीज, श्रीरंग या संस्था सहभागी होणार आहेत. तसेच रत्नागिरीतील स्थानिक रंगकर्मी सहभागी होणार आहेत.
सदर कार्यक्रमाच्या प्रवेशिका नाट्य परिषदेचे स्वा. वि.दा.सावरकर नाट्यगृह येथील कार्यालयात, सनी बेकर्स राम नाका रत्नागिरी आणि एम.के.एंटरप्रायजेस हॉटेल विहारवैभव समोर, बंदररोड रत्नागिरी या ठिकाणी नाट्य परिषदेचे आजीव सभासद तसेच रसिक प्रेक्षकांसाठी उपलब्ध राहतील, असे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर यांनी कळविले आहे.