(संगमेश्वर)
सामाजिक कार्यकर्ते, कुरधुंडा गावचे माजी सरपंच विद्यमान राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांचे कट्टर समर्थक जमूरत अलजी यांची आज संगमेश्वर तालुका नावडी व कसबा जिल्हा परिषद गटाच्या उपतालुका प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. त्या झालेल्या निवडीबद्दल जमुतर अलजी यांचे अनेक पदाधिकारी आणि राजकीय स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
जमुरत अलजी गेले अनेक वर्ष ना. उदयजी सामंत यांच्या समवेत खाडीपट्टा संगमेश्वर भागामध्ये काम करत आहे. तालुक्याच्या आणि विभागाच्या अनेक पदांवरती त्यांनी काम केलं आहे. सध्या अल्पसंख्याक विभागाचेही ते काम करत होते. तसेच विधानसभा क्षेत्र संघटक प्रमुख या पदावर ही त्यांनी अनेक वर्ष आपली जबाबदारी पार पडली आहे. या सर्व बाबतीचा विचार करता आणि कामाचा लेखाजोखा करता जमुरत अलजी यांच्या कामाची पोच पावती म्हणून त्यांना संगमेश्वर तालुक्याच्या नावडी आणि कसबा जिल्हा परिषद गटाच्या उपतालुकाप्रमुख या पदावर ती नेमणूक करण्यात आली आहे.
तालुक्यातील मतदारसंघांमधील लोकांमध्ये विविध विकास कामे, शासनाच्या विविध योजना,आणि पक्ष बळकटीकरण करणे या सर्व बाबींचा विचार करून जमूरत अलजी यांच्यावरती महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. दिलेल्या पदाला मी योग्य तो न्याय आणि पक्षासाठी अहोरात्र मेहनत करणार असल्याचा शब्द यावेळी जमुरत अलजी यांनी ना. उदयजी सामंत यांना दिला आहे. या यावेळी उपजिल्हा प्रमुखं राजेंश मुकादम,तालुकाप्रमुख प्रमोद पवार,विवेक शेरे,महेश देसाई,संदीप राहाटे,संजय कदम,अतिश पाटणे,तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.यां मिळालेल्या पदामुळे रत्नागिरीचे किंगमेकर किरण उर्फ भैय्या सामत,संपर्कप्रमुख सहदेव बेटकर,रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख राहुलजी पंडित, रत्नागिरी तालुकाप्रमुख बाबू म्हाप,तसेच सर्व पदाधिकारी यांनी जमूरत अलजी यांचे अभिनंदन केले.