चिपळूण : चिपळूण तालुक्यातील नायशी गावातील माजी सरपंच प्रतिभा भालचंद्र घाग यांचे ह्रदय विकाराने डेरवण येथे उपचार चालू असताना वयाच्या ७२ व्या वर्षी शुक्रवारी दुपारी १२ वाजता निधन झाले. त्याच्या पार्थिवावर नायशी येथील हिंदु स्मशान भूमीत अंत्यविधी पार पडला. यावेळी नायशी व पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
निवृत्त पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र नारायण घाग यांच्या प्रतिभा घाग या सुविध पत्नी तर शिवसेनेचे माजी उपतालुका प्रमुख किशोर घाग यांच्या मातोश्री होत्या.
कै. सौ. प्रतिभा घाग यांनी शेती व सामाजिक कार्यकरित आपल्या चार मुलांना उच्च शिक्षण दिले. प्रतिभा भालचंद्र घाग 1983 साली नायशी गावच्या प्रथम महिला सरपंच पदाची धुरा सभाळली. रत्नागिरी जिल्ह्याचे माझी खासदार स्व. गोवींदराव निकम याच्या निकटवर्तीय होत्या. निकम यांच्या प्रयत्नाने रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समिती कार्यकारणी सदस्या म्हणून नियुक्ती झाली होती. तसेच त्यांनी संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्यपदी असताना परिसरातील असंख्य निराधार महिलांना पेन्शन सुरू करून मोलाची मदत केली होती. त्यामुळे महिलांनी त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली आहे. कै. सौ.प्रतिभा घाग याच्या पश्चात पती श्री. भालचंद्र घाग, विवाहित मुलगे
मनोज, किशोर राकेश , सचिन ,सुना नातवंड असा परिवार आहे. त्याच्या अकस्मात निधनानंतर परिसरात दुःख व्यक्त होत आहे. त्याचा दशक्रिया विधी २६ सप्टेंबर तर उतरकार्य २८ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.