औरंगाबादमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भव्य सभा पार पडली. या सभेत त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुनव अन्य मुद्यांवरून भाजपवर चांगलाच निशाणा साधला. यावेळी त्यांनी शिवसेनेची हिंदुत्वाची भूमिका नेमकी काय आहे? याबाबत सविस्तर भाष्य केले. या सभेत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. संभाजीनंगर नामांतर होणारंच, बाळासाहेबांनी दिलेलं वचन मी पूर्ण करणार असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथे आयोजित जाहीर सभेत केले. औरंगाबाद येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपने पाणीप्रश्नासाठी काढलेल्या आक्रोश मोर्चावर जोरदार हल्लाबोल केला. तो आक्रोश पाण्यासाठी नव्हता तर सत्ता गेली म्हणून होता असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे, अशी शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. पण औरंगजेब नावाच्या सगळ्याच व्यक्ती सारख्या नसतात असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट करुन दिलं. छत्रपती संभाजी महाराजांची मुघल बादशाह औरंगजेबने खूप हाल करुन हत्या केली होती. त्यावरुन तो औरंगजेब याचा मातीत गाडला गेला. त्या शहराचे म्हणजे औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे,अशी शिवसेनेची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. पण औरंगजेब नावाच्या सगळ्याच व्यक्ती सारख्या नसतात असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट करुन दिलं. यासाठी त्यांनी देशाच्या सीमेवर काश्मीरमध्ये शहीद झालेल्या औरंगजेब नावाच्या जवानाचा दाखला दिला.
“काश्मीरमध्ये आज काश्मिरी पंडितांची हत्या होतेय. असाच एक सैनिक होता. तो सैनिक आपल्या देशाकडून लढत होता. त्याने अनेक अतिरेकी मारले होते. तो गनमॅन होता. सुट्टी होती म्हणून घरी जायला निघाला. पण त्याचं रस्त्यातून अपहरण केलं गेलं. अपहरण केल्यानंतर शोधाशोध सुरु झाली, आणि मग एके दिवशी छिन्नविछिन्न झालेला, हालहाल करुन मारलेला त्याचा मृतदेह लष्कराला सापडला. त्या सैनिकाचं नाव ‘औरंगजेब’ असं होतं. जो आपल्या देशासाठी शहीद झाला. तो माझ्या देशासाठी लढला. जो माझ्या देशाला मातृभूमी समजतो, देशासाठी मरायला तयार आहे तो धर्माने कुणीही असला तरी तो आमचा आहे, हे आमचं हिंदूत्व आहे”,असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस हे बाबरी पाडायला गेले होते की नव्हते हे समोर आलं पाहिजे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. आमदार अतुल सावेंचे वडील बाबरी पाडायला गेले होते, त्यांनीच नक्की सांगावं की फडणवीस बाबरी पाडायला गेले होते की नव्हते. हिदुत्त्वासाठी कुणी काय केलं हे एकदा एका मंचावर होऊन जाऊद्या, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी या सभेच्या निमित्ताने भाजपला दिले.