(जाकादेवी / वार्ताहर)
मंथन द स्कूल आँफ क्रिएटिव्ह अँडव्हर्टायझिंग अँड आर्ट,रत्नागिरीच्या मंचावर वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये सर्वात लहान ,3D रांगोळी काढून विक्रम करणाऱ्या श्री. राहुल कळंबटे यांचा शाल ,श्रीफळ व भेटवस्तू, रोपटे देऊन प्रेरणादायी विशेष सत्कार करण्यात आला.
राहुल कळंबटे हे रत्नागिरील सेंट थाॅमस विद्यालयात ‘कला शिक्षक’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कलाकृतीने दोन महिन्यापूर्वी त्यांनी एक विश्वविक्रम नोंदवला होता. आणि पुन्हा एकदा World Smallest 3D Rangoli ची Asia Book of Record आणि Worldwide Book of Record मध्ये नोंद झाली आहे. या नेत्रदीपक कार्याची दखल घेऊन रत्नागिरीतील मुलांसमोर एक आदर्श व्यक्तीमत्वाचा सहवास लाभावा या मुख्य उद्देशाने मंथन स्कूलने या सत्काराचे आयोजन केले होते.
राहुल कळंबटे यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांनी स्वतःच्या जीवनातील काही रंजक किस्से विद्यार्थ्यांसमोर मांडले. आज कला क्षेत्रात काम करताना इच्छाशक्ती , संयम, मेहनत, सातत्यपूर्ण कलाकृती साधण्याचा सराव आणि त्यातून आत्मविश्वास वाढवणे गरजेचे असल्याचे त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.विद्यार्थ्यांच्या विविध गुणकौशल्यांचे त्यांनी यावेळी कौतुक केले आणि मंथनच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे नियोजन ब्रँचहेच प्रा.संदेश पालये यांनी केले.याप्रसंगी सेवानिवृत्त शिक्षक श्री. विनायक हातखंबकर, राज्य पुरस्कार विजेते शिक्षक व खेडशी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.सुभाष पाटील, प्रा.प्रतिक्षा पांचाळ उपस्थित होते.