(रत्नागिरी)
नाणीज येथील माध्यमिक विद्यामंदिर आणि ज्युनिअर कॉलेजचे वरिष्ठ लिपिक श्री. शंकर नारायण शेलार हे ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांची त्यांचा शाळेतर्फे नुकताच गौरव करण्यात आला.
श्री शेलार यांनी सन १९९१ पासून म्हणजे गेली ३२ वर्षे अविरतपणे प्रशालेची कार्यालयीन धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांनी संस्थेचे लिखित दस्तावेज पूर्ण करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. शालेय प्रशासकीय कामांमध्ये नियमितता, काटेकोरपणा, अचुकपणा इ. आपल्या गुणांनी प्रशालेतील काम अधोरेखीत करण्यात शेलार सर यशस्वी झाले. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपताना त्यांनी विविध स्तरावर काम केले.
शाळेचे काम सांभाळतानाच त्यांनी आपल्यातील कलाही जोपासली. नाणीजमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा असतो. सेवानिवृत्त होताना शाळेप्रती कृतज्ञता म्हणून शाळेच्या विकास कामासाठी त्यांनी 50 हजार रुपयांची देणगीही संस्था अध्यक्षांकडे सुपूर्द केली. नाणिज प्रशालेचे संस्थापक श्री रामकृष्ण कात्रे सर यांनीही शेलार सरांचे सुंदर हस्ताक्षर, तसेच त्यांचा कामातील टापटीपपणा याबाबत त्यांचे कौतुक केले.
शेलार सरांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला नाणीज हायस्कूलचे संस्थापक गुरुवर्य कात्रे सर, संस्थेचे अध्यक्ष प्रशांत कदम, प्राचार्य मोहन बनसोडे, उपाध्यक्ष राजेश कोळवणकर, सेक्रेटरी सुधीर कांबळे, खजिनदार रविंद्र संसारे, सदस्या हेमलता भागवत, रविंद्र दरडी, तसेच नाणीज गावचे सरपंच गौरव संसारे, माजी मुख्याध्यापक रमानंद लिमये, मनोहर पोतदार , जोगळेकर सर, शिवाजी शेलार, कुंभार सर शाळेचे माजी सचिव बाळकृष्ण. सरफरे, सर्व शिक्षक परिवार उपस्थित होता. शेलार सर यांच्या पत्नी सौ उमा शेलार, चिरंजीव सौरभ शेलार यांच्यासह येथील ग्रामस्थ शरद खटकुळ, राजन बोडेकर, रविंद्र शिंदे, पोलीस पाटील नितीन कांबळे सह गावातील इतर ग्रामस्थ ही मोठ्या संख्येने सेवानिवृत्ती सत्कार गौरव कार्यक्रमाला उपस्थित होते. शेलार सर यांना सर्व मान्यवरांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.