(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील नाणीज येथे अवैधरित्या गावठी दारू बाळगणाऱ्यावर ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आल़ा. रविवारी दुपारी 1.20 च्या सुमारास छापा टाकून पोलिसांनी ही कारवाई केल़ी. प्रकाश शिवराम शिवगण (56, ऱा नाणीज शिवगणवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आह़े.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाणीज येथे अवैधरित्या गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत़ी. त्यानुसार 4 मार्च 2023 रोजी पोलिसांकडून छापा टाकण्यात आल़ा. यावेळी प्रकाश शिवगण याच्या ताब्यात अवैध गावठी दारू आढळली, याबाबतची तक्रार ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस फौजदार मोहन कांबळे यांनी दाखल केल़ी. त्यानुसार पोलिसांनी रवींद्र याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारू अधिनियम कमल 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.