(राजापूर)
सागरी पोलीस ठाणे नाटेच्या कार्यक्षेत्रात सागरी कवच अभियान नुकतेच यशस्वीपणे राबविण्यात आले . संपूर्ण कोकण किनारपट्टीवर सागरी कवच अभियानांतर्गत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दि. 11 ते 13 एप्रिल या दरम्यान रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग कोकण परिक्षेत्र या भागात सागरी सुरक्षा अनुषंगाने “सागर कवच अभियान” राबविण्यात आले.
सागर कवच अभियान करीता भारतीय नौदल, कोस्ट गार्ड, पोलीस दल, कस्टम बंदर, बंदर विभाग, एम. एमबीए, एम.एमडी, सीआय एस.एफ,एम.आयडी, आयबी, फिशरीज विभाग, तसेच इतर संबंधित संस्थाचा सागर कवच अभियान दरम्यान सहयोग होता
या अभियान दरम्यान “रेड फोर्स” (शत्रुपक्ष) यांचा उद्देश- विविविध प्रकारची जहाजे, नौकाचा वापर करून समुद्र किनारी उतरणे ब्लयु फोर्स (मित्रपक्ष)
उद्देश- सदर पथकामध्ये भारतीय तटरक्षक दल, पोलीस, सीमा शुल्क, विभाग मत्स्यव्यवसाय व बंदर विभाग या विभागातील स्पीड बोटीचा वापर करण्यात येणार आहे.
अशा प्रकारे कोर्ड वापरून सागर कवच अभियान राबविण्यात आले. सागरी सुरक्षेच्या दृष्टीने सागरी किनारी, लँडिंग पाँईट, मर्मस्थळ, जेटी, बंदर या ठिकाणी सतर्क राहुन संशयास्पद हालचाली, अनोळखी इसम, नौका आढळून आल्यास किंवा आक्षेपार्ह दिसल्या त्या बाबतची माहीती पोलीस ठाणे, अथवा नियंत्रण कक्ष (02352′,222222,100 ) किंवा टोल फ्री. नं 1093 वर कळविण्यात यावे असे आवाहन करण्यात आले होते
सागरीमार्गे होणारी घुसखोरी व आंतकवादी हल्लाच्यावेळी सागरी सुरक्षेशी संबंधित सर्व विभागांनी घ्यावयाची खबरदारी या करीता प्रभावी पणे गस्त होण्यासाठी उपाययोजना म्हणून सागर कवच अभियान राबविण्यात आले होते.
राजापूर तालुक्यातील सागरी पोलीस ठाणे नाट्याच्या हद्दीत जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक आबासाहेब पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी तसेच या अभियानाशी संलग्न सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच सागरी सुरक्षा रक्षक यांनी या अभियानात सहभाग घेतला होता. धारतळे चेक पोस्ट येथे नाका-बंदी तसेच जैतापूर फाटा येथे बंदोबस्त तर सागवे, तुळसुंदे, धाऊलवल्ली तरबंदर, साखरीनाटे मुसाकाजी या जेटीवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता.