(रत्नागिरी)
जेवण करण्यासाठी सोबत बाहेर न आल्याच्या रागातून एकाला हातांनी मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना मंगळवार १८ जुलै रोजी रात्री ११ वा. नाचणे येथे घडली आहे.
विजय निवास साळोखे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, संशयीत आरोपी विजय साळोखेने त्यांना बाहेर जेवण्यासाठी बोलावले होते; परंतु फिर्यादी यांनी नकार दिला. याचा राग मनात धरून विजय साळोखेने फिर्यादीच्या अपार्टमेंटजवळ जाऊन त्यांना खाली बोलावून घेतले. फिर्यादी खाली आले असता संशयित विजयने त्यांना शिवीगाळ करत हातांच्या थापटांनी मारहाण केली. त्यानंतर हातात दगड घेऊन त्यांच्या चेहऱ्यावर डाव्या बाजूला मारून दुखापत केली. या प्रकरणी संशयित आरोपी साळोखे विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.