(रत्नागिरी)
शहरालगतच्या नाचणे सहकारनगर येथील शाळकरी मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या पालकांनी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात दिली आहे. ती मुलगी गुरुवारी (२३ नोव्हेंबर) आपल्या घरातून निघून गेलेली ती घरी परत आली नसल्याचे तिच्या पालकांनी कळविले.
ही मुलगी इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेते. २३ नोव्हेंबर २०२३ रोजी ती मैत्रिणीकडे जाते, असे सांगून राहत्या घरातून निघून गेली होती. ती रात्रीपर्यंत घरी परतली नाही. मुलगी घरी न आल्याने पालकांच्या मनात भीती निर्माण झाली. याबाबत तिच्या पालकांनी नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याकडे चौकशी केली. त्यानंतरही तिची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. त्यानंतर पालकांनी थेट रत्नागिरी शहर पोलिस स्थानक गाठले. तिला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले असावे, अशी फिर्याद तिच्या पालकांनी शहर पोलिस स्थानकात दिली आहे.
पोलिसांनी याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करुन अज्ञाताविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास रत्नागिरी शहर पोलिस स्थानकाचे पोलिस करत आहेत.